[+]Feedback

+

 
2 nos. of persons are required on Contract for cleaning office premises.     Hiring of DG sets in the year 2018-19 for various live / recording programmes for Doordarshan Kendra,Worli,Mumbai as given in ANNEXURE - I \"     Tender Notice for Hiring of taxis     Now all Mumbai city and Suburban viewers may watch different SD & HD Doordarshan channels (DD Sahyadri, DD News, DD National, DD Bharati, DD Sports, DD Urdu.....) on their mobile without any internet connection. For more information, please contact to Doordarshan Kendra Mumbai (022-24948752)    
ABOUT US

 

“सत्यम शिवम सुंदरम” हे दूरदर्शन चं ब्रिदं वाक्य आहे. जे खरं आहे, तेच सुंदर आहे आणि तेच चिरंतन पणे टिकून रहातं असा आमचा दृढ विश्वास आहे.

 

मुंबई दूरदर्शन केंद्राची स्थापना २ ऑक्टोबर १९७२ रोजी झाली. दूरदर्शन ही भारताची एकमेव सार्वजनिक प्रसार वाहिनी आहे. मुंबई दूरदर्शन केंद्र हे देशातलं दुसरं सर्वात मोठ केंद्र आहे. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून २४ तास विविध कार्यक्रमांच प्रसारण करणारं हे केंद्र आहे. ह्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाचं शिक्षण,मनोरंजन आणि उद्बोधन करणं असा बहुपेडी प्रयत्न आम्ही करत असतो.ह्याच बरोबर महाराष्ट्रात आणि जगभरातल्या मराठी भाषिक लोकांपर्यंत मराठी संस्कृतीचा ठेवा पोहोचवण्याचा ही आमचा प्रयत्न असतो.

 

त्यासाठी अनेक नामवंत कलाकारांचे कार्यक्रम आम्ही सातत्याने दाखवत असतो. मनोरंजना च्या बरोबरीने वैज्ञानिक दृष्टीकोणाचा प्रसार करणे, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रिय एकात्मता वुद्धिंगत करणे आणि नवीन प्रतिभेला वाव देणे ह्या बद्दल ही आम्ही जागरुक असतो.

Mahacharcha

Live TV