[+]Feedback

+

 

दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान – २०१६

महोदय

        मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीने दरवर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे राज्यातील प्रगतीशील शेतकरी / कृषी संस्था यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 

      यंदाचा “९ वा आर.सी.एफ सुजला दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान – २०१६” पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार दि. ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी ३.०० ते ५.३० या वेळेत दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई -४०००३० इथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. 

        या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. आर.जी.राजन, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टीलायझर्स लि.मुंबई.,डॉ. तपस भट्टाचार्य, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी, श्री. मुकेश शर्मा, अप्पर महासंचालक, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई, श्री. विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेता, दिग्दर्शक, श्री. सौरभ एस. धानोरकर, व्यवस्थापकीय संचालक, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, लि. मुंबई., राम जवाहरानी, संस्थापक, सहयोग फाउंडेशन, मुंबई हे मान्यवर उपस्थित होते.

       मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

       स्वागत व प्रास्ताविक दूरदर्शनचे अप्पर महासंचालक श्री. मुकेश शर्मा यांनी केले तर श्री. शिवाजी फुलसुंदर, उपमहासंचालक, 

 दूरदर्शन केंद्र, मुंबई यांनी आभार प्रदर्शन केले.

       या सोहळ्यात पारंपारिक लोककलांसह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. 

    या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक “राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टीलायझर्स लि. मुंबई” तर सहप्रायोजक “फिनोलेक्स पाईप्स” हे आहेत.  

 राज्यातील कृषी क्षेत्राशी निगडीत पाच विद्यापीठांच्या सहकार्याने आणि दूरदर्शनने गठीत केलेल्या विशेष निवड समितीद्वारे ११ विविध घटकक्षेत्रात शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. 

या सोहळ्याचे प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवरून शनिवार दि. १९ मार्च २०१६ रोजी सायं ४.३० ते ७.०० यादरम्यान होणार आहे.

      सोबत पुरस्कार विजेत्यांची यादी जोडली आहे.

कृपया आपल्या वृत्तपत्रात या पुरस्काराचे वृत्त प्रसिध्द करावे, ही विनंती. 

आपले सहकार्य अपेक्षित आहे. 

                                                                                    सादर,

 

 

 

(शिवाजी फुलसुंदर)

उपमहासंचालक (कार्यक्रम)

दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई

 

सुशिलेचा देव

Live TV