[+]Feedback

+

 

१० वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान–२०१७asasa

                                   १० वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान–२०१७” पुरस्कार वितरण सोहळा

 

मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीने दरवर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे राज्यातील प्रगतीशील शेतकरी आणि कृषी संस्था यांना दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते    

             यंदाचा आर.सी.एफ.सुफला प्रस्तुत “१० वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान–२०१७” हा पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार दि. १६ मार्च २०१७ रोजी चेंबूर इथल्या आरसीएफच्या गंगाधर देशमुख सभागृहात संपन्न झाला.या सोहळ्यात कृषी आयुक्त, महाराष्ट्र,श्री.विकास देशमुख हे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते,तर प्रमुख पाहुणे श्री.चंद्रकांत दळवी सहकार आयुक्त, महाराष्ट्र,श्री.सुरेश वॅारियर,,संचालक(वित्त),राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टीलायझर्स लि.मुंबई, डॉ.ए.के. मिश्रा, कुलगुरू,महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर,श्री.शिवाजी फुलसुंदर,केंद्र प्रमुख उपमहासंचालक, दूरदर्शन केंद्र,मुंबई,डॉ.श्रीरंग कद्रेकर,माजी कुलगुरू,डॉ.शंकरराव मगर,,माजी कुलगुरू,श्री.पोपटराव पवार,कार्याध्यक्ष,आदर्श गाव समिती,श्री.प्रमोद कर्नाड ,व्यवस्थापकीय संचालक,श्री.विक्रम गोखले,ज्येष्ठ अभिनेता,दिग्दर्शक,डॉ.निशिगंधा वाड, लेखिका आणि अभिनेत्री,श्री.रवि पटवर्धन,ज्येष्ठ अभिनेता,श्री.प्रमोद पवार,ज्येष्ठ अभिनेता हे मान्यवर उपस्थित होते.

              मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

                स्वागत व प्रास्ताविक मुंबई दूरदर्शनचे केंद्र उपमहासंचालक श्री.शिवाजी फुलसुंदर यांनी केले.

           या सोहळ्यात पारंपारिक लोककलांसह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले.

          या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टीलायझर्स लि.मुंबई हे आहेत. 

       राज्यातील कृषी क्षेत्राशी निगडीत पाच विद्यापीठांच्या सहकार्याने आणि दूरदर्शनने गठीत केलेल्या विशेष निवड समितीद्वारे ११ विविध घटकक्षेत्रात शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल निवड समितीने या वर्षी विशेष पुरस्कारासाठी “कृषी विज्ञान केंद्र, बारामती” या संस्थेची निवड केली.

या सोहळ्याचे प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवरून मंगळवार दि. २८ मार्च २०१७ रोजी सायं ४.०० ते  ६.३० या दरम्यान करण्यात आले.

 

सुशिलेचा देव

Live TV